BSNL WiFi Offer : स्वस्त रिचार्ज प्लॅनसाठी ओळखल्या जाणाऱ्या भारत संचार निगम लिमिटेड अर्थात बीएसएनएल या एकमेव सरकारी टेलिकॉम कंपनीने आपल्या वाय-फाय युजर्ससाठी एक मोठी आनंदाची बातमी दिली आहे. वाढत्या स्पर्धेच्या काळात आपल्या ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी बीएसएनएलने आपल्या 'सुपरस्टार प्रीमियम' वाय-फाय प्लॅनच्या दरात २० टक्क्यांची कपात जाहीर केली आहे.
काय आहे ही खास ऑफर?
बीएसएनएलचा लोकप्रिय 'सुपरस्टार प्रीमियम' वाय-फाय प्लॅन आता ग्राहकांना पूर्वीपेक्षा स्वस्त दरात मिळणार आहे. या प्लॅनमध्ये ग्राहकांना केवळ डेटाच नाही, तर मनोरंजनासाठी अनेक प्रीमियम ओटीटी प्लॅटफॉर्मचा एक्सेस देखील दिला जातो.
ऑफरचे महत्त्वाचे तपशील
- पूर्वीची किंमत : ९९९ रुपये प्रति महिना.
- ऑफरमधील किंमत : ७९९ रुपये प्रति महिना.
- सवलत : २० टक्के थेट कपात.
- या सवलतीचा लाभ घेण्यासाठी ग्राहकांना १२ महिन्यांचे (१ वर्ष) अॅडव्हान्स पेमेंट करावे लागेल.
मिळणार 'डेटा'चा महासागर आणि ८ OTT फ्री!
बीएसएनएलच्या या ७९९ रुपयांच्या (सवलतीनंतर) प्लॅनमध्ये युजर्सना दरमहा तब्बल ५००० GB (५ TB) डेटा मिळतो. याशिवाय, काही लोकप्रिय ओटीटी प्लॅटफॉर्मचे सबस्क्रिप्शन पूर्णपणे मोफत दिले जाते. जिओ हॉटस्टार, सोनी लिव, Zee5, लायन्सगेट, शेमारूमी, हंगामा, एपिकऑन आणि YuppTV या चॅनेल्सचा यात समावेश आहे.
ऑफरचा कालावधी आणि अर्ज कसा करावा?
ही विशेष ऑफर १४ जानेवारी २०२६ पासून सुरू झाली असून ती ३१ मार्च २०२६ पर्यंत वैध असेल. या मर्यादित कालावधीत प्लॅन खरेदी करणाऱ्या युजर्सनाच ही सवलत मिळणार आहे.
वाचा - स्वतःचा व्यवसाय सुरू करायचाय? मोदी सरकार देतंय ९० हजारांचे कर्ज; अर्ज करण्याची सोपी प्रक्रिया
असा करा अर्ज
बीएसएनएलने हा प्लॅन खरेदी करण्याची प्रक्रिया अत्यंत सोपी केली आहे. ग्राहक त्यांच्या १८०० ४४४४ या व्हॉट्सॲप क्रमांकावर 'Hi' असा मेसेज पाठवून नवीन प्लॅनसाठी नोंदणी करू शकतात किंवा अधिक माहिती घेऊ शकतात.
